4D सोनोग्राफी
मशीन
GE Voluson P8
आम्ही US FDA मंजुरी असलेल्या सर्वोत्तम श्रेणीतील 4D अल्ट्रासाऊंड आणि कलर डॉपलर मशीन वापरतो.
सोनोग्राफी हे गर्भवती स्त्रियांसाठी एक वरदान असलेले तंत्रदान आहे. ध्वनीलहरींचा वापर केला जातो. हे पूर्णत: सुरक्षित व निर्धोक तंत्रज्ञान आहे. सोनोग्राफी करण्याने गर्भास कोणतेही धोका होत नाही.
आमच्या 4D मशीनचा वापर करून आम्ही बाळाची प्रतिमा तयार करू शकतो.
4D सोनोग्राफी फोटो
गर्भावस्थेतील सोनोग्राफी केव्हा व का करावी
१) पहिले ७ ते १० आठवडे
- गर्भधारणा व्यवस्थीत आहे का
- गर्भाची वाढ व्यवस्थीत आहे का
- गर्भ किती आहेत म्हणजे जुळे वगैरे
- गर्भाच्या भोवती रक्तस्त्राव आहे का
- गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा आहे का
२) ११ ते १३ आठवडे
जेनेटिक दोष उदा. डाउन्स सिन्ड्रोम असण्याची शक्यता आहे का — न्युकल ट्रान्स्लुयेन्सी आणि नेसल बोन बघतात.
३) १८ ते २० आठवडे
गर्भाचे सर्व अवयव उदा. मेंदू, मनके, छाती, पोटातील अवयव, किडनी, हात-पाय यामध्ये काही दोष आहे का हे बघितले जाते.
४) बाळाची वाढ पाहण्यासाठी ३० ते ४२ आठवडे
बाळाचे वजन, गर्भजलाचे प्रमाण, बाळाची हालचाल, बाळाचा रक्तपुरवठा यांचा अभ्यास केला जातो. मागील गर्भधारणेत गुंतागुंत असल्यास, गर्भजल कमी झाल्यास, किंवा मधुमेह असल्यास याची शिफारस केली जाते.
सोनोग्राफी शेड्यूल
| आठवडे | उद्देश |
|---|---|
| ७ – १० | गर्भधारणा, गर्भाची संख्या, बाहेरील गर्भधारणा नाकारणे |
| ११ – १३ * | न्युकल ट्रान्स्लुयेन्सी — डाउन्स सिन्ड्रोम तपासणी |
| १८ – २० * | अवयव तपासणी — सर्व गर्भाचे अवयव |
| ३० – ४२ | वाढ तपासणी — वजन, गर्भजल, हालचाल, रक्तपुरवठा |
* सर्वात महत्वाचे